कारंजा - दि.१ मे 2023 रोजी हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (नागरी आरोग्य वर्धीनी केन्द्र) या दवाखान्याचा शुभारंभ कारंजा शहरातील माळीपुरा येथे आमदार राजेन्द्र पाटणी साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्यात ३४२पैकी ३१७ कार्यान्वित झालेल्या ठिकाणी दवाखान्याचे डीजीटल अनावरण मुंबई येथे
संपन्न झाले. कारंजा येथील माळीपुरा येथे कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब व व्यासपीठावरील मान्यवर व उपस्थित नागरीक यांनी संपूर्ण डिजिटल कार्यक्रम पाहिला. हा डिजिटल अनावरण सोहळा मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस,सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.प्रा. तानाजी सावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला.कारंजा येथील कार्यक्रमात सर्व मान्यवर यांचे डिजिटल कार्यक्रमातील मार्गदर्शन संपताच आमदार राजेंद्र पाटणी यांनी आरोग्य देवता धन्वंतरी यांच्या फोटोस हार अर्पण केला त्यानंतर येथील दवाखान्याचा रीतसर फित कापून शुभारंभ केला. माळीपुरा येथील कार्यक्रमात आमदार राजेंद्र पाटणी यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रज्ञा पाटिल यांनी केले. कार्यक्रमात व्यासपीठावर सर्व आ.राजेंद्र पाटणी,भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक,राजीव भेंडे,सत्यजित गाडगे आदींसह डॉ.एस आर नांदे (THO कारंजा) डॉ.कपील सुर्वे M O UPHC कारंजा),डॉ.प्रज्ञा पाटील (M O) आपला दवाखाना माळीपुरा डॉ.महिमा मुकुंद (M O) आरोग्यवर्धिनी केंद्र साळीपुरा.) डॉ.निलम जमनानी (M O) आरोग्यवर्धिनी केंद्र गौतम नगर) इत्यादी होते.कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे पदाधिकारी,सर्वश्री भाजपा जैन प्रकोष्ठचे ज्ञायक पाटणी,शहर सरचिटणीस शशी वेळूकर,युवा मोर्चा पदाधिकारी समीर देशपांडे,युवा मोर्चा शहर अध्यक्ष अमोल गढवाले,सविज जगताप,प्रविण धारस्कर,कार्यकर्ते,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचारी,सर्व आरोग्य सेविका,सेवक,आशा सेविका हे हजर होते.शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासून तसेच झोपडपट्टी वस्ती पासून नागरी
प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असणे,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाच्या अयोग्य
वेळा,काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवा पासून वंचीत राहत आहेत. तसेचराज्यातील दवाखाने अत्याधुनिक
तंत्रज्ञानाने समृध्द बनवण्यासाठी, सातत्यपुर्ण
आरोग्य गुणवत्तासेवा प्रदान करण्यासाठी,विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, तसेचसुलभ आणी परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण आरोग्य निर्देशांक वाढवण्याकरीता
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाना” च्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्यशासनाचा निर्णय आहे.
महाराष्ट्र राज्यात ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे.शहरी भागातील
जनसामान्य,गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणा-या नागरीकांसाठी सार्वजनिक आरोग्य
विभागाअंतर्गत
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेआपला दवाखाना" ही नागरी आरोग्य वर्धीनी केंद्रे१५
व्या वित्त आयोग अंतर्गत स्थापन केली जात आहेत.शहरी भागातील ऐकुन
लोकसंख्येपैकी साधारणतः १२,००० ते२०,००० लोकसंख्येसाठी एक या प्रमाणे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" स्थापन केले जातील.हिंदु हृदयसम्राट
. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे एकुन
३४२ पैकी ३१७ कार्यान्वित झालेल्या ठिकाणी १ मे
२०२३ पासून कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे सदर प्रकल्पाची लोकोपयोगीता लक्षात
घेऊन सदर केंद्रांच्या संख्येत वाढ करून त्यात विनामुल्य वैद्यकीय चाचण्या,चिकित्सा व उपचार
करण्यात येतील.अशी माहिती
या ठिकाणी देण्यात आली.असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....