शेतात काम करीत असलेल्या महिला ला वाघाने हल्ला करून ठार केले तर गर्दीतल्या लोकांच्या अंगावर आल्याने एक जखमी झाले. ही घटना काल सायंकाळी २६ एप्रिल रोजी घडली.5
सावली तहसील मुखाल्यापासून पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोली बुट्टी येथील ममता हरिश्चंद्र बोदलकर वय ६५ वर्ष ही महिला आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच गावकन्यांनी घटनास्थळी गर्दी केली. महिलेला ठार केल्यानंतर वाघाने जवळच आपला दबा धरून ठेवला व अर्ध्या तासातच गर्दीतल्या लोकांच्या अंगावर आल्याने त्या लोकांपैकी गोवर्धन नामक व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत झाली.
वाघाने महिलेला ठार केलेल्या घटनेची वन विभागाला माहिती कळताच वनविभाग व पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाले. मौका पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. सदर घटनेने सावली परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण कायम आहे.