पावसाळा म्हटलं म्हणजे हवामानामुळे किरकोळ आजार डोकं वर काढतात. अशावेळी प्रत्येकाकडे औषध पाण्याकरीता पैसे हवे असतात. निराधार ज्येष्ठ नागरीकांच्या औषधपाणी आणि उदरनिर्वाहाकरीता केन्द्र आणि राज्य शासनाकडून "श्रावण बाळ ज्येष्ठ नागरीक योजना" चालवीली जाते. परंतु गेल्या दोन महिन्यापासून श्रावण बाळ योजनेचे पैसे निराधाराच्या खात्यात जमा करण्यात आलेच नाही. त्यामुळे गरजू वयोवृद्ध निराधार संबधीत बँकामध्ये येरझार करीत असून, अद्याप बँकेत पैसे जमाच झाले नसल्यामुळे त्यांना हेलपाटे होत असल्याचे चित्र कारंजा तालुक्यामध्ये दिसून येत आहे.