शासन निर्णयात 16 कामांना मंजुरात*
ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजूर निधी व आमदार निधीतील सहभागातून होणार कामे
कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे):- आमदार राजेंद्र पाटनी यांनी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेसाठीच्या तरतूदीतून गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविने या योजनेतंर्गत मतदार संघातील विकासकामे प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत प्रस्तावीत केली होती. आमदार मा. श्री. राजेंद्र पाटणी यांच्या पत्राचा उल्लेख या निर्णय परिपत्रकात आहे.
मंजूर कामांची एकूण अंदाजित किंमत 4 कोटी 80 लक्ष आहे.शासनाकडे पाठपुरावा करून या कामांना मंजुरी मिळाली आहे.या करीता आमदार स्थानिक विकास निधीतून मंजूर करावयाचा निधि 1 कोटी 60 लक्ष आहे. सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षातील ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेसाठीच्या तरतूदीतून गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे या योजनेतंर्गत विकासकामांना मंजूरी देणेबाबत महाराष्ट्र शासनच्या आदिवासी विकास विभागाने दिनांक 28 आगष्ट2023 रोजी शासन निर्णय क्रमांक तबायो २०२३/प्र.क्र. ५१/का. ९ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ शासन निर्णय जाहीर केला आहे.सदर प्रस्तावित केलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
गावांतर्गत आदिवासी वस्त्यांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत गावातील विकासकामांसाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट- अ प्रमाणे एकूण रू. ३२०.०० लक्ष (अक्षरी रु. तीन कोटी वीस लक्ष फक्त) इतक्या रक्कमेच्या एकूण १६ कामांना नमूद अटींच्या अधिन राहून प्रशासकीय मान्यता देवून प्रशासकीय मान्यतेच्या १५ टक्के प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांना रू. ४८.०० लक्ष इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
सदर कामांना प्रथमतः आमदार स्थानिक विकास निधीतून कामांची मंजुरी होवून निधी प्राप्त झाल्याची खात्री प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी करावी अशी अट शासन निर्णयात आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून मंजूर करावयाचा निधि प्रत्येक कामांकरिता 10 लक्ष असून ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजने अंतर्गत नमूद प्रत्येक कामास 20 लक्ष रुपये निधि मंजूर करण्यात आला आहे.
असे प्रत्येक कामास अन्दाजीत 30 लक्ष निधि राहील.
जामदरा जामदरा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथे सभा मंडप बांधकाम अंदाजपत्रकीय किंमत तीस लक्ष रुपये, जनुना खुर्द येथे सभा मंडपबांधकाम अंदाजित किंमत 30 लक्ष रुपये रुपये, रामतीर्थ तालुका मानोरा येथे सभा मंडप बांधकाम अंदाजित किंमत 30 रुपये लक्ष रुपये, यशवंत नगर तालुका मानोरा येथे सभा मंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30 लक्ष रुपये, पाळोदी तालुका मानोरा सभा मंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30 लक्ष रुपये, पिंपळशेंडा तालुका मानोरा येथे सभामंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30 लक्ष रुपये तीस लक्ष रुपये, सिंगणापूर तालुका कारंजा येथे सभा मंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30 लक्ष , उमरी बुद्रुक तालुका मानोरा येथे सभा मंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30 लक्ष रुपये, खेर्डा तालुका कारंजा येथे सभा मंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30 लक्ष रुपये, गायवळ तालुका कारंजा येथे सभा मंडप बांधकाम अंदाजित किंमत 30 लक्ष रुपये, शेमलाई तालुका कारंजा येथे सभा मंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30 लक्ष रुपये , किसान नगर तालुका कारंजा येथे सभा मंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30लक्ष रुपये, भिवरी तालुका कारंजा येथे सभा मंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30 लक्ष रुपये, गोंडेगाव तालुका मानोरा सभामंडप बांधकाम अंदाजित किंमत 30 लक्ष रुपये, मोहगव्हाण तालुका मानोरा सभा मंडप बांधकाम अंदाजित किंमत 30 लक्ष रुपये, मेंद्रा तालुका मानोरा सभा मंडप बांधकाम अंदाजीत किंमत 30 लक्ष रुपये.
हीआदिवासी वस्तीतील कामे ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजूर निधी व आमदार निधीतील सहभागातून होणार आहे.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....