पोळ्याच्या सणाच्या पर्वावर रामपूर चक येथील गुराखी देवराव प्रधान हे आपल्या गाई बैलांना व गावातील काही शेतकऱ्यांचे गुरे रामपूर जंगलात चारण्यासाठी नेले असता कक्ष क्र.42 पूर्व दिशेला १५ सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता दरम्यान गुराखी जनावरे चारत असतांना वाघाने डरकाळी फोडली त्यावेळेस सर्व गुरे सैरावैरा पळण्यास सुरू केली त्यावेळेला गुराखी देवराव प्रधान यांच्यावर वाघाने झडप घातली मात्र त्या झडपेतून गुराखी थोडक्यात बचावला नंतर व आसाराम प्रधान यांच्या बैलावर वाघाने झडप घालून जखमी केले.