कारंजा (लाड) : दि. १-१०-२०२३ रविवारला प.पु. नारायण महाराज ज्ञानमंदिर कारंजा (लाड) येथे गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे सचिव संजय नेमाणे सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री नेमाणे मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी एक तास स्वच्छतेसाठी हा उपक्रम राबविण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला आवाहन केलेले होते. स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम "कचरामुक्त भारत" आहे. त्यानुसार शाळेमध्ये स्वच्छतेसाठी ह्या महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आलेले होते. या अंतर्गत शाळा, शाळेचे पटांगण तसेच शाळेभोवतीचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनीही मोठ्या उत्साहाने हातभार लावला.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक निखिल घुगे, विकी शिरसाट तसेच शिक्षिका शिल्पा नेमाने, कविता देशमुख, राखी जिचकार, सरला कडोळे, तृप्ती उखळकर, दिपाली कदम, मुस्कान नंदावाले, सोनाली शहाकार, वैष्णवी हजारे, प्रिया लळे, वैष्णवी लव्हाळे, शिवानी गोंडाळ, उत्कर्षा हांडे, समीक्षा घोगरे, श्रुती बंगाले, अंजली साखरकर, अंकिता आसरकर व निराली रौरासे यांचे योगदान लाभले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....