सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलूकामगार कल्याण मंडळ अधिनियम २००८, या कायद्याची प्रभावी अंमलबिावणी करणे, तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फम त घरेलूकामगारांची नोंदणी/ नुतणीकरण वाढवीणे, या अनुषंगाने असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच देण्याची मागणी कॉ. रमेश गायकवाड कॉ. नयन गायकवाड, बाळकृष्ण तायडे, वंदु वाघ, उज्वला गवई, मंदा गवई, लाल बावटा घर कामगार संघटनेच्या संसार उपयोगी संच मागणीला यश आले आहे संसार उपयोगी संच वाटप करण्याबाबतचा शासन निर्णय आज दि. २२.०२.२४ रोजी काढला आहे.
संसार उपयोगी संच योजनेचा लाभ अकोल्यातील घरेलु कामगार यांनी घ्यावा. त्या संबंधची बैठक रवीवारी लाल बावटा युनियन कार्यालयावर घेण्यात येईल त्या करीता जास्तीत जास्त घरकामगार यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कॉ. नयन गायकवाड यांनी केले आहे.!