वाशिम : जिल्ह्यात रिसोड तालुक्यातील लोणी येथे संत सखाराम महाराज यांच्या 144 व्या पुण्यतिथीनिमित्त 21 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2022 पर्यंत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन संपूर्ण जिल्हयात पाळण्यात येणार आहे. 6 डिसेंबर बाबरी मस्जीद पतन दिनानिमित्त मुस्लीम संघटनाकडून काळा दिवस व हिंदु संघटनाकडून विजयी दिवस मनविण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 7 डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्हयातील श्री दत्त मंदिराच्या ठिकाणी धार्मीक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हयात 287 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घोषीत झाल्या असून 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्हयात आदर्श निवडणुक आचारसंहिता लागू आहे. तसेच विविध पक्ष/संघटना/ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वेगवेगळया मागण्याकरीता धरणे/आंदोलने/उपोषण करण्यात येत आहे. जिल्हा सण-उत्सवाच्या तसेच राजकीय दृष्टिने संवेदनशील आहे. वरील कालावधीत जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी 23 नोव्हेंबरपासून ते 7 डिसेंबरपर्यंत जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही. असे वृत्त महाराष्ट्र ग्रामिण पत्रकार परिषदेला मिळाले आहे .