तालुक्यातील नवेगाव (किटाळी ) येथील निलेश राजेश्वर गेडाम वय १३ वर्ष हा मुलगा मागील काही दिवसांपासून पोटाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपचार करतांना आर्थिक अडचण निर्माण झाली होती.
सदरची बाब राज्याचे आपत्ती व्यवस्थापन,मदत-पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना किटाळी (नवेगाव )येथील ग्राम काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब त्यांना कळवली असता त्यांनी आपल्याकडून सदर मुलास वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत दिली.
सदरची आर्थिक मदत देताना सौ, सुषमाताई उके सरपंच किटाळी, श्री शांताराम रामटेके ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष किटाळी ,श्री भारत जी मडावी ग्राम काँग्रेस उपाध्यक्ष किटाळी , श्री हेमंत मसराम ग्राम काँग्रेस सचिव किटाळी ,श्री दीपक कुभरे ग्राम काँग्रेस सहसचिव किटाळी ,श्री भगवान कृष्णाके कोषाध्यक्ष ग्राम काँग्रेस कमिटी किटाळी ,श्री नीलकंठ कोटनाके सोशल मिडीया प्रमुख किटाळी , श्री देवचंद वरठे नवेगाव ,श्री राजेंद्र नैताम नवेगाव ,श्री लक्ष्मण मडावी रोजगार सेवक किटाळी व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.