वडसा :-
रानभाज्यांची महती लक्षात घेऊन मागील ८ वर्षापासून कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांचे पुढाकाराने जिल्हास्तरावर रान भैरी भाजी महोत्सव आयोजित केल्या जात आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल राज्यश्यासनाने घेत सन २०२०-२१ वर्षी पासून ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव तालुका स्तर ते जिल्हास्तरापर्यंत आयोजित करण्याबाबत निर्देश दिले आहेत, त्या अनुषंगाने वडसा तालुका कृषी अधिकारी कार्यालया मार्फत दिनांक १२ ऑगष्ट २०२४ रोजी पंचायत समिती सभागृह येथे रानभाजी महोत्सव- २०२४ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते..
कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी गडचिरोली जिल्हा भाजपा उपाध्यक्ष माननीय मोतीलालजी कुकरेजा, प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी श्रीमती प्रणाली कोचरे, पंचायत समिती कृषी अधिकारी श्री जितेंद्र तोडासे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गणवीर मॅडम, माविम संचालिका मामिडवर मॅडम, उमेदच्या वडसा तालुका व्यवस्थापक श्रीमती अश्विनी गनविर मॅडम, पंचायत समिती वडसाचे श्री. राठोड, भंडारेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री गोपाल बोरकर उसेगाव, तसेच वडसाचे तालुका कृषी अधिकारी श्री पीडी खंडाळे मंचावर उपस्थित होते. कृषि विभाग, मविम व उमेदचे संलग्न विभाग अधिकारी व कर्मचारी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. त्याचबरोबर शेतकरी गटाचे सभासद , महिला शेतकरी व महिला बचत गटांच्या सदस्य मोठया प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री. पी डी खंडाळे यांनी केले. प्रास्ताविक मध्ये त्यांनी हंगामी स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या चा वापर दैंदिन आहारात करावा तसेच PMFME योजनेचा लाभ घेऊन त्यांचे प्रक्रिया युक्त पदार्थ तयार करून विक्री व्यवसाय करण्यासाठी उद्योग उभारणी करण्याकरिता उपस्थितांना प्रवृत्त केले.
गडचिरोली जिल्हा हा आदिवासी व ७० टक्के वन व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोली चे वन वैभव हे सुविख्यात आहे. जगातील दुर्मिळातील दुर्मिळ वनस्पती व त्यांचा उगम स्थान गडचिरोली जिल्ह्याच्या वनात आहे. आयुर्वेदातील नमूद दुर्मिळ वनस्पती जश्या हिमालयात आढळतात तस्याच बहुतेक वनस्पती गडचिरोली च्या वनात आढळतात. त्यापैकी बऱ्याच वनस्पतीची फुले, पाने, मुळे, कंद , फळे इत्यादींचा येथील आदिवासी बांधव नागरिक दैनंदिन आहारात तसेच विविध संसर्गजन्य व दुर्धर आजारावर उपाय म्हणून वापर करतात. याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा तसेच पाककला च्या माध्यमातून विविध प्रसार माध्यम जसे यु ट्यूब, फेस बुक मार्फत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करून नारा कमवावा असे मत संवर्ग विकास अधिकारी, वडसा श्रीमती प्रणाली खोचरे यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यात तालुकास्तरावर रानभाजी महोत्सवाचे आयोजन करुन रानभाज्यांच्या गुणधर्मानुसार विविध आजारांवर त्यांचा उपयोग व्हावा व त्याबद्दल शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना व शेतकऱ्यांना त्याची माहिती व्हावी याकरीता त्यांच्या वापरानुसार जिल्ह्यातील आदिवासी भागातील जंगलामध्ये मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध करुन परिसरातील बाजारामध्ये यांची विक्री करुन जिल्ह्यातील आदिवासी व इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा मिळेल यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत माविम च्य श्रीमती मामिडवार यांनी केले.तसेच पशुधन विकास अधिकारी डॉ. गणवीर मॅडम यांनी ह्या राणभाजी उत्सवाला स्तुत्य उपक्रम म्हणून नमूद केले आणि भविष्यात असे उपक्रम सुरू राहावे असे मत व्यक्त केले.
पंचायत समिती कृषि अधिकारी श्री. तोडासे यांनी रानभाजी पाक कला ही एक आगळी वेगळी संकल्पना असून त्याला जनमाणसात चांगली प्रसिद्धी व मागणी मिळण्याचे संकेत आहेत असे मत मांडले.
रानभाजी महोत्सवाचे औचीत्य साधुन रानभाजी माहिती पुस्तीकेचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात 35 शेतकरी गट, महिला शेतकरी गट, माविमचे गट, इ. गटामार्फत रानभाजी व रानभाज्यांचे पदार्थाचे प्रदर्शन व विक्री करीता उपलब्ध करुन देण्यात आले होते.
आजच्या रानभाजी महौत्सवाचे आयोजन रानभाजी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते त्यात एकूण 25 गट व व्यक्तिगत स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असुन सदर स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार रु.2001, द्वितीय पुरस्कार रु.1501, तृतीय पुरस्कार रु.1001 देण्यात येणार आहे.
पाककृती स्पर्धेचे मुख्य परीक्षक ,संवर्ग विकास अधिकारी श्रीमती प्रणाली खोचरे , सहपरिक्षक म्हणून श्री तोडासे व डॉ. गणवीर मॅडम यांनी स्वयम् स्फुर्तीने कार्यवाही पार पाडली.
अध्यक्षीय भाषणात गडचिरोली जंगलव्याप्त प्रदेश असून इथे रासायनिक खते आणि कीडनाशक अत्यल्प प्रमाणात वापरले तथा जातात, तसेच मोठे औद्योगिक प्रकल्प या ठिकाणी नसल्यामुळे परिणामी इथल्या जंगलावर किंवा जीवश्रुष्टीवर अजूनतरी विपरीत परिणाम झालेला नाही. तथापि इथले हवामान शुद्ध असून इथल्या रान भाज्या अधिक याआरोग्यदाई, शक्तिवर्धक आहेत. करिता सध्या स्थितीतील पावसाळी संसर्गजन्य आजाराला लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारशक्ती पाहिजे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या अत्यंत उपयुक्त असून त्यांचा आहारात समावेश केल्याने आरोग्यसंपन्न राहता येईल. तसेच बाजारीतील भाजीपाला बाहेरून येत असल्याकारणाने खूप महाग असतो, परिणामी सर्वसाधारण नागरिक वा शेतकरी खरेदी करू शकत नाही. त्याला उत्तम, स्वस्त व आरोग्यदायी पर्याय म्हणजे रानभाज्या आहेत. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिजे, जीवनसत्वे प्रथिने असतात. विशिष्ट हंगामातच उपयुक्त रानभाज्यांचा उगम होत असतो, ते त्याच हंगामात सेवन केल्याने मानवी आरोग्य सुदृढ राहू शकते. रानभाज्याबाबत आदी सर्व वैशिष्ट्य, त्यामधील घटक, वापर ह्या बाबतची माहिती पुस्तिका तयार केलेली आहे. जेणेकरून सर्वसामान्यापर्यंत माहिती पोहोच होईल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान अधिक असून सर्वाधिक भात पिक लागवड केली जाते, त्यामुळे बिगर हंगामी भाजीपाला बाहेरून येत असून त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि कीडनाशक यांचा वापर केला जातो. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊन अनेक दुर्धर आजार संभावित असल्यामुळे रानभाज्यांचा वापर दैनदिन आहारात करावा व रानभाज्या ,सेंद्रिय शेतमालाची प्रक्रिया करून विक्री व्यवस्थापन करून आर्थिक विकास करावा असे आवाहन श्री. कुकरेजा यांनी केले.
रानभाजी मध्ये तरोटा भाजी, आंबाडी भाजी,अळुचे पान,पातूर भाजी, कोचईचे पान, केना भाजी, बांबूकोंब (वास्ते), केवकंद, हेटीचे फुले, कोचईचे पान, सुरण, अरतफरी भाजी, कुडवा फुल, काटवल, खापरखुटी, लेंगडी भाजी, शेरडीरा, मटारु, केन्या भाजी, आंबाडी भाजी, कुडा शेंग, फास चे पान, तुटोबाची फुले, बोपीन भाजी, सिलारी भाजी, धान भाजी, हात केना, इत्यादी रानभाज्यांचे इत्यादी स्टॉल त्यांचे पाक कृती सह लावण्यात आलेले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता तालुका कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शनात कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आयोजन श्री व्हि. डि रहांगडाले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले. तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील कृषि पर्यवेक्षक श्री. उमाकांत बोधे, श्री. भुषण देशमुख, सर्व कृषि सहायक वृंद, उमेद चे प्रशांत मंडपे यांनी सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....