वरोरा :--तालुका वरोरा तालुक्यातील फत्तापूर या गावातील महिला मंगला उर्फ उर्मिला गुलाब बावणे वय 42 वर्ष या महिलेने काल दि५ऑक्टो. रोजी सायंकाळच्या सुमारास विष प्राशन करून आत्महत्या केली.
मंगला उर्फ उर्मिला गुलाब बावणे .वय 42 वर्ष ही आपल्या पती गुलाब बावणे यांच्यासोबत रोज मजुरीचे काम करीत होती. या महिलेला दोन मुले असून शाळेत शिक्षण घेत आहे ,मोठा मुलगा विशाल शाळेतून घरी आल्यावर ही माहिती कळतात त्यांनी संबंधित नातेवाईक आणि वडिलांना याची माहिती दिली . मृतक उर्मिलाने वंदना फायनान्स वरोरा. ग्रामीण कुट्टा ,हिंगणघाट. वरोरा प्युअर फायनान्स. समुद्रपूर ,वर्धा येथील डेली फायनान्स या अटीवर कर्ज घेतले होते हे कर्ज दोन ते तीन महिन्यापासून थकीत झाल्याने या कंपनीचे कर्मचारी, अधिकारी घरी येऊन घाण, अवाच्च शब्दात बोलून जात होते अशी माहिती मृतक उर्मिलाच्या मोठ्या मुलाने प्रतिनिधीशी बोलताना दिली या संपूर्ण प्रकाराला कंटाळून काल दि 5 सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्याची विष प्राशन करून आत्महत्या केल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला, या सर्व फायनान्स कंपनी यांना रिझर्व बँकेकडून कोणत्या पद्धतीच्या अटी शर्तीवर मान्यता देण्यात आली आहे याची सखोल चौकशी करणे आता गरजेचे झाले असून पोलीस , संबंधित विभाग तसेच पोलीस प्रशासन याकडे महत्त्वाची काय भूमिका बजावतात याकडे जनतेचे लक्ष लागले