ब्रम्हपुरी:- महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती ब्रम्हपुरीच्या वतीने ब्रम्हपुरी येथील जुना मच्छी मार्केट कोट तलाव, बाजार चौक प्रस्तावित जागेवर रामायण रचनाकार, आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेच्या रुपात असलेले महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर प्रमुख वक्त्यांनी समाज बांधवांना उद्बोधन केले व त्यानंतर ब्रम्हपुरी शहरातून महर्षी वाल्मिकी यांची रथातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.उपस्थित समाज बांधवांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनानाथजी वाघमारे संयोजक संघर्ष वाहिनी नागपूर हे होते तर उद्घाटक म्हणून प्रकाशजी डाहारे सेवानिवृत्त सहसंचालक विदर्भ विकास महामंडळ,नागपूर, प्रमुख अतिथी मीनाक्षीताई गेडाम सामाजिक कार्यकर्ता आरमोरी, प्रकाशजी पचारे संचालक पवनी,यशवंतराव दिघोरे उपाध्यक्ष जिल्हा सहकारी बँक चंद्रपूर, डॉ. हिरालाल मेश्राम ब्रम्हपुरी, डॉ. विलास दुधपचारे आरोग्य अधिकारी ब्रम्हपुरी, प्रभूजी वाघधरे अध्यक्ष महर्षी व्यास नागरी पथसंस्था ब्रम्हपुरी तथा उत्सव समितीचे सर्व सदस्यगण व ब्रम्हपुरी येथील समस्त ढिवर व भोई समाजातील नागरिक हजारो संख्येने उपस्थित होते.
आपल्या समाजाची उन्नती करायची असेल तर शिका संघटीत व्हा,संघर्ष करा.आपला समाज संघटीत नसल्याने आपली प्रगती करू शकत नाही बाबासाहेबांचे आपल्या जगण्यात उतरवायचे असतील तर संघटना शिवाय पर्याय नाही. असे प्रतिपादन मिनाक्षीताई गेडाम यांनी आपल्या भाषणातून केले.
आपल्या समाजाची अशाप्रकारे एकजुट राहील्यास प्रत्येक राष्ट्रीय पार्टी आपल्या समाजातील होतकरू नेत्यांना आमदार. खासदार यासारखे प्रतिनिधित्व देण्यास तयार आहेत. याकरिता समाजात जागृत करणे आवश्यक आहे असे उद्बोधन प्रकाशजी डाहारे यांनी केले. तर दिनानाथजी वाघमारे यांनी भोई समाजाच्या दशा आणि दिशा यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत प्रभुजी वाघधरे यांनी महर्षी व्यास नागरि पथसंस्था व महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव व शोभायात्रेची संघर्ष गाथा संबोधित केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवोदित कवी संतोष मेश्राम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोदजी दिघोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वितेसाठी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समितीचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.