कारंजा लाड -- भारतरत्न स्व. राजीव जी गांधी वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षीच देशाचे पंतप्रधान झाले.तरुण वयात पंतप्रधान बनल्याने साहाजिकच आधुनिकीकरणाच्या दिशेने त्यांची पाऊले पडत गेली,कालांतराने स्व.राजीवजींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कार्यातून आपल्या देशवासियांना पाहावयास मिळाला.आणि ह्याच स्व. राजीवजी गांधी मुळे देशात संगणकीकरणाचे युग येऊन खऱ्या अर्थाने ओळख झाली असल्याचे मत वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार ह्यांनी व्यक्त केले.
कारंजा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती दि. 20 ऑगस्ट रोजी सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.त्यावेळी देवानंद पवार बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोजराज,वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ॲड.संदेश माणिकचंद जिंतुरकर [जैन], जिल्हा काँग्रेस पदाधिकारी ॲड निलेश कानकिरड,शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमीरखान पठाण व साहेबराव पवार यांनी स्व राजीवजींच्या फोटोला हारापर्ण करुन आदरांजली अर्पण केली.
या कार्यकमाला ॲड वैभव ढगे,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय देशमुख,सैय्यद इरशाद भाई, युसुफ भाई जट्टावाले, अभिजित शिंदे,फैजल खांन पठाण,अक्षय बनसोड,कादर अहमद खान,एजाज भाई ठेकेदार, शोराब खांन,फैजान खांन,रेहान खांन,दानिश खांन, तौसिफ खांन,सद्दाम खांन व सोनु खांन उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड.संदेश माणिकचंद जिंतुरकर यांनी केले. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना ॲड संदेश जिंतुरकर यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....