युवारंग परिवार तर्फे कुरखेडा तालुक्यातील मौजा उराडी येथे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी निशुल्क समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या समर कॅम्प मध्ये विद्यार्थ्यांना नृत्यकला ,टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु बनविणे, लगोरी, क्रिकेट सारखे क्रीडा , शरीर विज्ञान, पर्यावरण संवर्धन इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले या निशुल्क समर कॅम्प चा समारोप सोहळा दिनांक १ मे २०२२ ला पार पडला.
याप्रसंगी या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.वर्षाताई कोकोडे पंचायत समिती सदस्य कुरखेडा. , उराडी चे सरपंच मा. सोनीताई वट्टी युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष मा.राहुलजी जुआरे आरमोरी , स्वंय रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती चे अध्यक्ष मा. चारुदत्त राऊत ,आरमोरी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. सुरेशजी चौधरी उराडी , उपाध्यक्ष स्थानी. मा. मडावी सर कुरखेडा तर प्रमुख अतिथी म्हणून संजयजी चौधरी, सुरेशजी हांडेकर,राधेश्यामजी दडमल, पारेश्वरजी घोडमारे उपस्थित होते याप्रसंगी मंचावरून उद्घाटकीय मार्गदर्शन करताना युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष मा.राहुलजी जुआरे यांनी या समर कॅम्प चे उद्देश्य मुलांच्या सुप्त गुणांना उजळणे व वाव देणे हे आहे आज समर कॅम्प ही संकल्पना मोठ्या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुजलेली आहे व त्यात खूप मोठ्या प्रमाणात पालकांना पैसे मोजावे लागतात मात्र युवारंग तर्फे आरमोरी शहरात मागील ४ वर्षापासून निशुल्क समर कॅम्प चे आयोजन केल्या जात आहे समर कॅम्प मध्ये आरमोरी, गडचिरोली ,ब्रह्मपुरी ,वडसा, सिंदेवाही, नागपूर, चंद्रपूर अन्य शहरातील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो मात्र ग्रामीण भागातील उराडी या गावातील हे समर कॅम्प पहिले प्रयोग होते व ते यशस्वीरित्या पार पडले या समर कॅम्प मध्ये शिकवण्यात आलेल्या मूल्यांना आचरणात उतरवून आपल्या जीवनात प्रगती करावी. या कार्यक्रमाचे संचालन उद्धवजी वाकडे यांनी केले तर आभार साहिल वैरागडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनाला युवारंग च्या सर्व सदस्यांनी व उराडीतील नागरिकांनी सहकार्य केले.