देशाचे सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे तिसऱ्यांदा सरकार स्थापना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता अजित दादा पवार सुनील तटकरे प्रफुल भाई पटेल यांच्या नेतृत्वात संकल्पित असून महाराष्ट्राच्या विकासासाठी व अकोल्याच्या सर्वसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी युवा नेतृत्वाला नरेंद्र मोदी यांच्या शिलेदाराला विजयी करा असे आवाहन महानगर अध्यक्ष विजय देशमुख यांनी केले.
स्थानिक सेंट्रल प्लाझा हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि कार्यकर्ता पदाधिकारी व भाजपा उमेदवार लोकप्रतिनिधी यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्राचा विकास झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात महिलांना मोफत बस सुविधा सोबत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना जलसिंचन दळणवळणाची सोय उपलब्ध झाली आहे डबल इंजन सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे 14 कोटी जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार कटीबद्ध असून प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा मोदी यांचे शिलेदार व स्वतःला अजित दादा पवार समजून घरोघरी मताचा जोगावा मागून प्रचंड बहुमताने अनुप धोत्रे यांना विजयी करेल व ओबीसी समाजाला न्याय मिळणारच असा विश्वास व्यक्त करून सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वासाने वाटचाल करूया असे यावेळी माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी प्रतिपादन केले.
यावेळी वसंत खंडेलवाल यांनी केंद्र सरकारने राज्य सरकारच्या योजनेची माहिती दिली.. राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध आघाड्याचे प्रमुख पदाधिकारी महानगराचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी आमदार अमोल मिटकरी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला.
आमदार रणधीर सावरकर विजय अग्रवाल किशोर पाटील यांचे सुद्धा सोमविचित भाषणे झाली कार्यक्रमाचा संचालन जयंत मसणे तर आभार प्रदर्शन सुषमा निचळ यांनी केले.