अकोला:-
धोतिर्वस्तिस्तस्था नेति: नौलिकी त्राटक तथा |
कपालभातिश्श्चैतनी षटकर्माणी समाचरेत् ||
मागील 25 वर्षापासून अजिंक्य फिटनेस पार्कच्या माध्यमातून दीपावली निमित्त योग-व्यायाम- शुद्धिक्रिया शिबिराचे आयोजन निशुल्क करण्यात येते या वर्षाला दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर 2024 रोजी आयुर्वेदिक महाविद्यालय व अजिंक्य कौशल्य विकास संस्था यांच्या सहकार्यातून शिबिर आयुर्वेदिक महाविद्यालय येथे संपन्न झाले. ज्याप्रमाणे दीपावली निमित्त आपण घराची, परिसराची, प्रतिष्ठानची साफसफाई करतो त्याचप्रमाणे शरीरामध्ये अस्वच्छता साफ करणे.
शिबिरामध्ये शरीर संचलन, ओंकार, प्रार्थना, विविध मनोरंजन खेळ,कपालभाती, उडीयानबंद ,अनुलोम विलोम, त्राटक चे विविध प्रकार, उज्जायी, भ्रामरी प्राणायाम, विविध सूर्यनमस्कार पद्धती,जलनेति , वमन इत्यादी योग- व्यायाम प्रकार व शुद्धिकेचे प्रकार सहभागी सदस्यांनी भाग घेऊन पूर्ण केला.
सहभागी खालील व्यक्तींनी आपला अभिप्राय दिला तो असा-
ज्याप्रमाणे दात घासणे ही दातांची स्वच्छता आहे, त्याचप्रमाणे जल नेती ही नासिका ची स्वच्छता आहे. जल नेती मधे नाकपुड्यापासून घशापर्यंत, नाकाचा मार्ग शुद्ध आणि स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा वापर केल्या जातो .जल नेतिचे फायदे दैनंदिन सराव केल्यानी ,
नाकातील घाण आणि जीवाणू काढून टाकून नाकाची स्वच्छता राखण्यास मदत करते.श्वासोच्छ्वास सुलभ करण्यासाठी हे फायदेशीर आहे.हे सायनुसायटिस किंवा मायग्रेनचा त्रास कमी करण्यास मदत करते,टॉन्सिल्स आणि कोरडा खोकला यासारख्या वरच्या श्वसनाच्या तक्रारी दूर करू शकतात.
हे डोळ्याच्या नलिका साफ करू शकते आणि दृष्टी सुधारू शकते.
मला पहिल्यांदा जल नेती करायची कल्पना खूपच भीती दायक वाटायची
पण धनंजय सरांनी खूप सहज रित्या जल नेती चा डेमो दिला आणि त्यांच्या उत्तम मार्गदर्शना खाली मी सराव केला ,आता मी न घाबरता जल नेती चा सराव करते आणि मला जल नेती करायची आजीबात भीती वाटत नाही.
शिबिरामध्ये. सानिका खापरकर,किरण पांडे,डॉ. प्रवीना चौखंडे,डॉ. बेला राठी,कैलाश गणेशपुरे,सत्यनारायण शर्मा,माधवी रूपदे,कल्पेश ढोरे,रोहिणी पळसपगार,अरविंदआगरकर, लतिका खडसे,राधिका त्रिवाड, अभिलाषा खारकर ,दिपाली लांबे,अंकिता काटकर, अनुराधा तायडे ,संध्या इंगळे ,राधा येडलेवार,डॉ. शितल देशमुख, शिल्पा उनवणे,माधवी बिडवे, किरण देशमुख,कमलाकर वाडेकर, राजश्री लोहिया ,राजेश जालान,सारिका बाजोरिया,अक्षय काकणे ,अभिषेक चव्हाण,सरलता वर्मा ,सेवाराम राईकर ,सविता राठोड,अर्चना जोशी ,अजिंक्य बोबडे, डॉ.निर्मला रांदड ,गोपाल लढ्ढा ,हरीश पोरे,गजानन खुळे ,करण जोशी ,डॉ. शितल झवर,गौरव परमार, विनोद बोबडे, सारिका बोबडे ,डॉ. आदित्य नानोटी,राजेश राऊत ,राजेश हेगू ,वैशाली हेगू ,डॉ.राणी दुर्गुले ,प्रतिभा काकडे, वर्षा राठी, सोनल तीरकर,डॉ.रिचा पारिक,शितल अग्रवाल, प्राजक्ता कुरळकर, शैलेंद्र कुरळकर ,राकेश बाजोरिया, कविता अग्रवाल, डॉ. सचिन पारसकर,वंदना घाटोळ ,माया राठी ,आर्य अग्रवाल,वर्षा लोडम ,अजिंक्य बोबडे, डॉ. विमल भालेराव ,संतोषकुमार राजूरकर ,प्रकाश मिठणी,प्रिती पवार ,राजलक्षी देशमुख,ऋषाली मोहोड , ईशा मोहोड ,भाग्यश्री ढोरे,श्याम घावडे, विशाल बावसकर ,शितल पाडिया ,प्रकाश मीठानी,संध्या इंगळे , हर्शा मानकर,दशरथ घोगरे ,संचीता राजूरकर यांनी भाग घेतला.
राष्ट्रीय वैद्यकीय प्रसारक मंडळ, अजिंक्य कौशल्य विकास संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शारदा डोंगरे, प्रफुल वाघ, आशिष नेता, योगेश इंगळे, सागर लोबो यांनी शिबीर यशस्वी करता सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....