भद्रावती- भद्रावती तालुक्यातील ढोरवासा केंद्राचे शाळा पूर्व तयारी मेळावा चे वेळापत्रक ठरले असून केंद्रातील 11 जिल्हा परिषद शाळेने आपले मेळावा नियोजनाची तयारी केली आहे.
गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. श्री. प्रकाशजी महाकाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद शाळेने आपले नियोजन पूर्ण केले आहे अशी माहिती केंद्राचे केंद्रप्रमुख मा. भारतजी गायकवाड यांनी दिली आहे.
यात 23 एप्रिल ला जिल्हा परिषद शाळा ढोरवासा, गवराळा, चिरादेवी 24 एप्रिल ला जिल्हा परिषद शाळा देऊरवाडा, तेलवासा, कुनाडा, कोच्ची 25 एप्रिल ला जिल्हा परिषद शाळा चारगाव 26 एप्रिल ला जिल्हा परिषद शाळा पिपरी 27 एप्रिल ला जिल्हा परिषद शाळा मुरसा व घोनाड या शाळांनी आपले शाळा पूर्व मेळावा आयोजित केला आहे.
मेळाव्याला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केंद्रप्रमुख गायकवाड यांनी केले आहे.