अकोला:- महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी क्रमांक ७ ला अनुसरून आमदार रणधीर सावरकर यांनी आज सभागृहात वन्य प्राणी यांच्या मुळे शेतकऱ्यांच्या पिकांची होणारी नासाडी व आर्थिक नुकसान याबाबत प्रश्न उपस्थित केला,
राज्यात बेसुमार वृक्षतोड झाल्याने वनक्षेत्र कमी होणे, वनक्षेत्र कमी होत असल्याने वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये शिरणे, वन्यजीव निवास व पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे तसेच शेतीमध्ये धाव घेत वन्य प्राण्यांकडून शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होणे, वन्य प्राण्यांचे मानवावर व पशुधनावर वाढते हल्ले होणे, याबाबतीत शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मांडणी केली, आमदार रणधीर सावरकरांनी वस्तुस्थिती मांडताना उदाहरणार्थ एकट्या अकोला जिल्ह्यात २०१६-१७ वर्षांमध्ये ३ हजार २५८ शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्राचे वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्याने वन विभागातर्फे १ कोटी १७ लाख ४२ हजार रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली असली तरी मदत तोडकी आहे हे निदर्शनास आणून दिले,, शेतीला कुंपण घालण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी पुर्ण आर्थिक अनुदानीत योजना शासनाने राबवावी तसेच नुकसान भरपाईची मर्यादा वाढवावी, सोबतच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना आयुधांचा पुरवठा करावा अशी मागणी केली, तसेच नियमावलीत सुधारणा करणे, वन्य प्राण्यांमुळे शेतातील पीक किंवा फळबागांचे दरवर्षी सतत नुकसान होत असल्याने यावर सक्षमपणे कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्या कारणाने शासनाने तातडीने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी आमदार सावरकरांनी शासनास केली,