कारंजा : वाशिम जिल्ह्यातील स्थानिक कारंजा (लाड) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज दिनांक 5 जून रोजी राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थान, (भारत) शाखा वाशिम जिल्ह्याच्या वतीने कारंजा (लाड) येथील सहारा कॉलनी- गायकवाडनगर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्याने त्यांचेही याप्रसंगी अभिष्टचिंतन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी सुनीलभाऊ दशमुखे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका भजन प्रमुख रामबकसजी डेंडूळे, ह. भ. प. शीलाताई चिवरकर,सीमाताई सातपुते मीनाक्षीताई बोचरे,तुळजाई महिला मंडळाचे अध्यक्ष श्रीमती यमुनाताई राठोड, संतोषी महिला मंडळाचे अध्यक्ष आशाताई व्यवहारे, रुक्मिणीं महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिताताई उडाखे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी यावर्षी "झाडे लावा दारोदार"असा संकल्प करून व विविध घोषणा देऊन वृक्षारोपण करण्यात आले. कॉलनीतील नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपापल्या दारी झाडे लावून ती जगविण्याची हमी दिली. विशेष म्हणजे वृक्षप्रेमी यमुनाताई राठोड यांनी वर्षभर मेहनत करून अनेक झाडांची रोपे घरीच तयार केली ,त्या रोपांचे वाटप या वेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीमाताई सातपुते यांनी केले त्या म्हणाले की, दिवसेंदिवस वाढत असलेल्या पर्यावरणाला आळा घालायचा असेल तर झाडे लावणे हे काळाची गरज आहे. तर ह. भ.प. शिलाताई चिवरकर म्हणाले की, पर्यावरणाच्या दृष्टीने येणारा काळ हा भयावह आहे. झाडे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे.. म्हणून त्याचे संगोपन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. यावेळी मिनाक्षीताई बोचरे, ज्योतीताई सेंधवकर, पत्रकार प्रदीप पट्टेवार आदिची समायोजित भाषणे झाली. या प्रसंगी मंगलाताई मालखेडे, नंदाताई जाधव, छायाताई चिल्लेवार सुमनताई साखरकर,जिजाबाई विसरकर आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे आभार सीमाताई सातपुते यांनी केले.असे वृत्त विजय खंडार यांनी करंजमहात्म्य न्यूज नेटवर्क्स कारंजा यांना कळविले.