पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी मिशन उत्कर्ष सुरू करण्यात आलेले असून त्या अंतर्गत भारत सरकार व जर्मन सरकारच्या संयोगाने केंद्र शासनाने GIZ या संस्थेमार्फत SENU प्रकल्प राबविण्याबाबत माननीय पंतप्रधान यांनी देशातील दहा जिल्ह्यांची निवड केलेली असून त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यात (गडचिरोली चामोर्शी आरमोरी वडसा कुरखेडा आणि अहेरी) या मध्ये 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलींना आत्मनिर्भर व सशक्त बनविण्यासाठी पिरामल फाउंडेशन/ कैवल्य एज्युकेशन/पाठ फाउंडेशन माहे ऑगस्ट 2024 पासून प्रकल्प राबविण्यात येत आहे.
त्याच बाबतीत निरीक्षण करण्यासाठी तथा प्रत्यक्ष किशोरवयीन मुली, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत प्रशासन , प्रकल्प कार्यालय यांच्याशी चर्चा करण्याकरिता नाते आतापर्यंत जर्मन सरकारच्या वतीने श्रीमती अनिका रेनबोट . क्रिस्तोफर मुलिंगा यांनी मौजा जोगी साखरा व पाथरगोटा येथील अंगणवाडी केंद्रांना भेट दिली, भेटीदरम्यान त्यांनी किशोरवयीन मुलींना दिलेल्या प्रशिक्षणाविषयी, अंगणवाडी सेविका यांना दिलेल्या प्रशिक्षणाविषयी प्रत्यक्ष चर्चा करून केंद्र शासन व राज्य शासनाकडून किशोरवयीन मुलीं करिता राबवणाऱ्या योजना सोबतच GIZ - SENU प्रोजेक्ट कडून राबविणाऱ्या उपक्रमाबाबत किशोरी मुली व अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचेकडू जाणून घेतले, त्याप्रसंगी केंद्र शासनाच्या वतीने श्रीमती विद्याजी, मनमोहन उपस्थित होते. याप्रसंगी मौजा जोगी साखरा येथे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपक बनाये सरपंच संदीप ठाकूर बाल विकास प्रकल्प अधिकारी, मनोज मडावी अंगणवाडी पर्यवेक्षिका फुलमाला मेत्राम ,पचायत समिती मा.सदस्या वृंदाताई गजभिये सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम करीश्मा मानकर मुख्याध्यापक श्रीकृष्ण खरकाटे जोती घुटके उषा ज्यामुळे खेनलता हजारे महासागर सोरते शर्मिला धोगडे रीता घुटके रजनी सतिबावणे ग्रामसेवक कलगा ग्रामपंचायत अधिकारी, मुख्याध्यापक, आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका ,आशाताई , उमेद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य नागरिक किशोरी मुली उपस्थित होते.
जर्मनी विदेश व देश स्तरावरून मान्यवरांनी मौजा जोगी साखरा येथे भेट देऊन किशोरी मुलीं सोबत चर्चा करून त्यांना आत्मनिर्भर व सशक्त बनवण्यासाठी सरकार व विविध संस्था प्रयत्न करीत असल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.