वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर पोलीस स्टेशन हद्दीत घटना समोर आली आहे. पोलिस स्टेशनच्या डायरीत नोंद माहितीनुसार अॅम्बुलन्स मध्ये जुगार खेळताना तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली बीट कॉन्स्टेबल यांनी केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी सांगितले आहे.