कारंजा (लाड) ( जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : आषाढी यात्रेनिमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूरला लाखो वारकरी दरवर्षी जाउन तासनतास रांगेमध्ये राहून श्री विठुरायाचे पददर्शन घेऊन तृप्त होत असतात.परंतु कारंजा येथील वारकरी, राष्ट्रिय हिरकणी पुरस्कार प्राप्त कृपाताई ठाकरे ह्या मात्र याला अपवाद आहेत. त्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत असतांना आषाढी वारी मध्ये आरोग्य सेवेकरीता जात होत्या.मात्र सेवानिवृत्ती नंतरही त्यांची ही आरोग्य सेवेची वैयक्तिक वारी त्यांनी कायमच ठेवली आहे.दरवर्षी पंढरपूरला जातात.त्या केवळ वयोवृद्ध वारकऱ्यां मायबाप मानून त्यांची निःस्वार्थ सेवा करण्यासाठी.मायबाप वारकऱ्यांच्या सेवेतच त्यांना पांडूरंगाचे विठु रुक्मिणीचे दर्शन त्यांना घडत असल्याचे त्या मानतात. दरवर्षी प्रमाणे कारंजाहून महामंडळाच्या बसने त्या श्री क्षेत्र पंरपूरला दि 29 जूनच्या रात्री 2:00 वाजता पोहचल्या.प्रातःकाळीच एकादशीला कळसाचे दर्शन करून त्यांनी पायदळ वारी करणाऱ्या वयोवृद्धाच्या सेवेला सुरुवात केली.
आंतरराष्ट्रिय पर्यावरण संस्थेच्या त्या अमरावती विभागीय मार्गदर्शिका असून संस्थापक अध्यक्ष देवा तांबे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी वारकऱ्यांना मायबाप मानून संपूर्ण दिवसभर उत्तर रात्री पर्यंत अथकपणे त्यांचे हातापायाची खंडूचक्का वनस्पती सरसो तेलाची मालीश केली व आपले कार्य करतांना पर्यावरण, वृक्षसंगोपन व आयुर्वेदिक वनस्पती रोपणाची माहिती दिली. आपल्या सोबत त्यांनी खंडूचक्का तेलाच्या 30 बॉटल्स नेलेल्या होत्या व जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत त्यांचे सेवाकार्य सुरुच होते हे विशेष.सर्वप्रथम त्यांना पांडूरंगाच्या रुपात हभप चांगदेव देवकर व माता रुक्मिणीच्या रुपात सौ छबाबाई चांगदेव देवकर हे 80-85 वर्ष वयाचे, मुपो लोंडेवाडी ता.माढा जि. सोलापूरचे वयोवृद्ध वारकरी जोडपे आढळून आले. त्यांनाच मायबाप विठु रुक्मिणी मानून त्यांनी आपल्या सेवेचा प्रारंभ केला.व शेकडो वारकर्यांची स्वेच्छेने निःस्वार्थ सेवा करून आपली श्रीक्षेत्र पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केली.त्यांना सेवा करतांनाच कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे येथील अंगनवाडी सेविका श्रीमती वंदना गुल्हाने ह्या भेटल्या.व त्यांनी देखील निःस्वार्थ सेवेत हातभार लावला.असे वृत्त वारकरी मंडळाचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे .