वाशीम (दि. १९) – शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात वाशीम जिल्ह्यातील संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, डॉ. सिद्धार्थ देवळे यांची वाशीम जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.
डॉ. सिद्धार्थ देवळे हे पक्षाशी दीर्घकाळ निष्ठेने जोडलेले असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात सामाजिक, राजकीय आणि आरोग्य विषयक योगदान लक्षणीय राहिले आहे. पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठा आणि जिल्ह्यातील विविध स्तरांवरील संपर्कक्षमता लक्षात घेऊन त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेना नेहमीच नव्या आणि कार्यक्षम नेतृत्वाला संधी देत आली आहे. वाशीम जिल्हा हा पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, आगामी काळात पक्ष संघटन, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण आणि जनतेपर्यंत शिवसेनेचा अजेंडा पोहचवण्यासाठी डॉ. देवळे यांचं नेतृत्व मोलाचं ठरेल, असा विश्वास पक्षनेतृत्वाने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीनंतर वाशीम जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी डॉ. देवळे यांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून जिल्ह्यात नव्या जोमाने संघटन बांधणी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.