भारत स्काउट अँड गाईड कार्यालय गडचिरोलीच्या वतिने जिल्ह्यातील सर्व शाळेचे राज्य पुरस्कार करीता चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत संपूर्ण जिल्हयातून दोन शाळांची निवड झाली असून यामध्ये पॅराडाईज इंग्लीश मिडीयम स्कूल आरमोरी या शाळेचा समावेश आहे. यामध्ये कु. आकांक्षा छबिल देविकार व कु. वृषाली रविंद्र मडावी उतिर्ण झाले असून यांना कॉटिजंट लिडर म्हणून श्रीमती नितूरानी मालाकर यांनी मार्गदर्शन केले. या सर्वांचे दि. 26/04/2022 ला महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स् आणि गाईडस् च्या वतीने सन २०१८-१९ व २०१९-२० चे राज्यातील स्काऊट व गाईड राज्य पुरस्कार प्रमाणपञ वितरण महामहिम राज्यपाल मा.श्री भगत सिंह कोश्यारी म.रा,. तसेच मा. ना. सुनिल केदार क्रिडा व युवक कल्याण मंञी म.रा., मा. ना. आदिती तटकरे राज्यमंञी क्रीडा व युवक कल्याण म.रा. तसेच मा. ओमप्रकाश बकोरिया राज्य आयुक्त यांचे उपस्थितीत राजभवन मुंबई येथे पार पडला.
यात मा. आर. पी. निकम साहेब शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. गडचिरोली यांचे प्रेरणेने आपल्या जिल्ह्यातील स्काऊट आणि गाईड यांना राजभवनातील राज्यपाल पुरस्कार प्रमाणपञ वितरण कार्यक्रमाला उपस्थित होते . राज्य पुरस्कार प्राप्त विद्याथ्याचे व गाईड शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री . गोविंदराजन कवंडर, विभाग प्रमुख विजयालक्ष्मी कवंडर, मुख्याध्यापक केशवन कवंडर उप मुख्याध्यापिका किरण डाखोळे, मूख्याध्यापीका सुजाता मेहेर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच संपूर्ण जिल्हावासींयांनी अभिनंदन केले आहे.