कारंजा- तालुक्यातील यावर्डी येथील मंगेश लक्ष्मण इंगोले याला आदिशक्ती महिला संस्थेव्दारा दहा हजारांची शैक्षणिक मदत करण्यात आली.
मंगेश इंगोले हा यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात इयत्ता १० वी पर्यन्त शिक्षण घेतले व आता मंगेश हा बी.एस.सी कृषि पदविका द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ : ०० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक विजय भड यांच्या हस्ते मंगेशला दहा हजार रुपयाचा धनादेश देन्यात आला.
आदिशक्ति महिला बहुउद्देशिय संस्था वाल्हई व्दारा उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत व्हावी,विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून मंगेश इंगोले मागील वर्षी दहा हजारांची मदत केली होती,यावर्षी सुद्धा मंगेश ला दहा हजारांचा धनादेश उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आदिशक्ती संस्थेचे संचालक प्रा.निर्मलसिंह ठाकुर यांचे मुख्याध्यापक विजय भड व मंगेश चे वडील लक्ष्मण इंगोले यांनी आभार मानले.मंगेशला धनादेश देते वेळी शाळेचे शिक्षक गोपाल काकड,अनिल हजारे,शालिनी ओलिवकर व शिक्षकेत्तर कर्म. आणी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.असे वृत्त मुख्याध्यापक विजय भड यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे .