वाशिम ( संजय कडोळे ) : सध्या भारत पाकिस्थान सिमेवर तणाव वाढला असून,पाकिस्थानी आतंकवादी लष्कराकडून कडून वारंवार हल्ले होत आहेत.व आपले जवान त्या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देवून पाकिस्थानच्या कुरापती हाणून पाडत आहेत.सिमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युध्दाने सर्वांचीच हानी होत असते.युद्धामुळे नैसर्गिक,भौगोलिक,आर्थिक व निष्पाप लोकांची,मानवी जीवीताची प्रचंड हानी होते.त्यामुळे युद्ध लवकर संपून, आपली मातृभूमी सोबतच आपले सैनिक सुरक्षित राहून, विजयी पताका फडकून संपूर्ण जगात भारताचा डंका कायम रहावा.चहुबाजूंनी शांती,संयम व सलोखा रहावा.हीच सर्वांची इच्छा असते.अशा परिस्थितीत आम्हा भारतियांच्या संरक्षणार्थ सिमेवर पाकिस्थानशी झुंज देणाऱ्या भारतिय जवानांना दिर्घायुष्य लाभून त्यांची सुरक्षा करावी ह्यासाठी जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे दिंडीप्रमुख आणि विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी अवघ्या भारतियांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्राला साकडं घातलं असून,श्रीराम जपाचा संकल्प केला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, भारतिय सैन्यदलाच्या भूदल,नौदल,वायुदल या तिनही दलातील जवान हे आमच्यापैकीच आहेत.निश्चितच यापैकी कुणीतरी आपल्या गावातील,जिल्ह्यातील, प्रांतातील किंवा राज्यातील आहेत. त्यापैकी काही आपल्या नात्यातील तर काही आपल्या गावकरी मंडळींच्या नात्यातील असू शकतात.यापैकी अनेकजण अविवाहित असतील तर बरेच जणांचे विवाह नुकतेच झालेले असतील.भारतिय सैनिकांमध्ये काही आपल्या लेकीबाळी किंवा लाडक्या बहिणीही असतील.या सर्वांनी अक्षरशः स्वतःच्या घरादारावर आणि परिवारावर तुळशीपत्र ठेवून,मातृभूमिच्या आणि तुमच्या आमच्या संरक्षणाची शपथ घेऊन,स्वतःला भारतिय सैन्यदलात भरती करून घेतलेलं आहे.प्रखर उष्णता असो धो धो पाऊस असो किंवा कडाक्याच्या थंडी असो,वेळप्रसंगी अक्षरशः उपाशी तापाशी राहून सुद्धा स्वतःच्या प्राणाची बाजी लावून म्हणजेच तळहातावर प्राण घेऊन हे जवान आणि महिला सैनिक सिमेवर खडा पहारा देत शत्रूराष्ट्राचे हल्ले परतवून लावीत त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत असतात.सिमेवर आपले जवान सतर्क असल्यामुळेच आपण निवांतपणे जीवन जगत असतो. त्यामुळे त्यांचे आपल्यावरील उपकाराची जाणीव आपल्या सर्वांना असायला हवी आहे. आणि म्हणूनच,आपल्या ह्या जवानांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणे हे आपले कर्तव्य ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी परमेश्वराकडे ह्यांच्या सुरक्षेची, तन्दुरुस्तीची,आरोग्याची प्रार्थना करायला हवी आहे.म्हणून प्रत्येकाने आपले आराध्य दैवत प्रभू श्रीरामाच्या "श्रीराम जयराम जय जय राम !" या रामनामाची दररोज एक माळ जपून श्रीराम नामाची मनोमन शृंखला तयार करावी.व भारतिय जवानांचे आणि जवानांच्या कुटूंबियांचे मनोधैर्य वाढवावे.असे आवाहन जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे दिंडीप्रमुख तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी नागरीकांना केले आहे.