कारंजा : लोकसहभागातून, तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांच्या निःस्वार्थ समाज सेवेकरीता कटीबद्ध असलेल्या, कारंजा शहरातील संत गाडगेबाबा विचारमंच बहुउद्देशिय संस्था कारंजाच्या वतीने, रविवारी दि.२२ जानेवारी रोजी रुग्नवाहिकेचा लोकार्पण सोहळा अतिशय थाटात संपन्न झाला.
असे वृत्त प्रत्यक्षदर्शी असलेले पत्रकार संजय कडोळे यांनी दिले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कारंजा शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जेठूसेठ उपाख्य नरेंद्रजी गोलेच्छा, माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ डहाके, रविन्द्र शहाकार, अनिल मस्के , डॉ शार्दूल डोणगावकर, स्वप्निल गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्थानिक श्री कामाक्षा देवी संस्थानच्या सभागृहात हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी तथा कारंजेकर नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष संतोष धोंगडे व त्यांचे सहकारी राजेश चंदन, भारत हांडगे, रोहित देशमुख, चंद्रकांत धोंगडे, मागदर्शक मा. नगरसेवक प्रसन्ना पळसकर व संस्थेचे पदाधिकारी इत्यादी मंडळींनी केले होते. संचलन अजिंक्य जवळेकर यांनी केले .