स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कॉन्व्हेन्ट ब्रम्हपुरी येथे जागतिक महिला दिन प्रसंगी प्राचार्या सौ.मनिषाताई बगमारे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला .या निमित्याने विद्यार्थी व कर्मचारी यांनी सुध्दा आपसातील मतभेद विसरून प्रत्येकाशी स्नेहाने वागण्याचा जीवनभर प्रयत्न करावा व उत्तम नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करावा . आपल्या दररोजच्या जीवनात महिलांचे किती महत्व असते. आणि जगाच्या व सुदृढ समाज निर्मिती साठी महिलाचे योगदान किती मोठे आहे म्हणून महिला सदैव वंदनीय व आदरणीय आहेत हे मत प्राचार्या मनीषाताई बगमारे यांनी व्यक्त केले.स्त्रियांच्याअनेक रूपाची आपल्याला जाणीव व्हावी हे सर्व वक्ते यांनी स्पष्ट केले. व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्या दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन वैभव करंबे तर आभार तनय निकोडे यांनी केले. या प्रसंगी नीलिमा गुज्जेवार,निशा मेश्राम,योगिता बोकडे, योगिता नंदनवार,प्रगती शेंडे,वैशाली कुंभारे,पिंकी ठाकरे,नीलम सडमाके,रंजना कोहळे,वर्षा काटेखाये,मेघा राऊत,संजय नागोसे,देवकण्या रुईकर व अन्य यांनी विशेष परिश्रम घेतले.