आज दि.06/12/2023 रोजी जि.प. उच्च प्रा.शाळा, डोंगरगाव भू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा करून बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच प्रहार पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. निखीलजी धार्मिक हे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सचिन मेश्राम उपस्थित होते.. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. वामन गेडाम सर,श्री. नामदेव भोगे सर, कु. रत्नमाला रन माळे हे उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गीतगायन, भाषण अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचा मुख्यमंत्री तेजस विनोद तामशेट्टीवर यानी तर आभार प्रदर्शन मंथन या विद्यार्थ्याने केले. अध्यक्षीय भाषणातून मा. निखिलजी धार्मिक यांनी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपले विद्यार्थी जीवन उज्वल करावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.