अकोला.
श्रीराम कृष्ण विवेकानंद सेवा मंडळ द्वारा संचालित मा सारदा ज्ञानपीठ गीता नगर अकोला येथे श्रीमती गोदावरी देवी बजरंग लालजी केडीया चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला
ट्रस्टचे अध्यक्ष नवल किशोर अमृतलालजी केडीया , ट्रस्टी अँड प्रमोद अग्रवाल तसेच प्रा आदित्य अग्रवाल तसेच संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम राठी, सचिव नरेंद्र आढाव, मुख्याध्यापक प्रशांत खत्री, व्यवस्थापक राहुल देशमुख उपस्थित होते.
श्री नवल किशोर केडिया यांचे स्वागत श्रीराम कृष्ण विवेकानंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सत्यनारायण बाहेती यांच्या हस्ते तर अंड प्रमोद अग्रवाल आणि प्राआदित्य अग्रवाल यांचे स्वागत संस्थेचे सचिव नरेंद्र आढाव आणि प्रशांत खत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचा परिचय आणि प्रस्ताविक डॉ सत्यनारायण बाहेती यांनी केले त्यांनी आपल्या मनोगतात पूर्वीच्या वडीलधाऱ्या ट्रस्टीं नी आश्रम आणि सारदा ज्ञानपीठ जे छोटेसे रोपट लावले होते व त्याचे आज वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेले आहे व यापुढेही संस्थेची प्रगती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आणि त्याकरिता मान्यवरांचे भविष्यात सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली
श्रीमती गोदावरी देवी बजरंग लालजी केडीया ट्रस्ट ने सामाजिक बांधिलकी जोपासत श्रीराम कृष्ण विवेकानंद आश्रमाला त्यांच्या वडीलधाऱ्या मंडळींनी जे सहकार्य केले होते व त्याच सामाजिक बांधिलकी ची परंपरा कायम ठेवत आज त्यांच्या परिवारातील सदस्यांनी श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा मंडळाला भेट दिली. शाळेची प्रगती बघून त्यांनी समाधान व्यक्त केले व भविष्यामध्ये सुद्धा शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत शाळेमध्ये राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले
अँड. प्रमोद अग्रवाल यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या साहित्यांची आवश्यकता असेल ते ते पुरविण्याचा मानस व्यक्त केला.
प्रा आदित्य अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे . त्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती गावंडे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री प्रशांत खत्री यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेतील उपमुख्याध्यापिका श्रीमती सावित्री विश्वकर्मा, शिक्षिका पद्मिनी शिंदे, पुनम गावंडे, दिपाली चव्हाण ,किरण तायडे, योगिता सरनाईक सुषमा दाभाडे , प्रतिभा दुधे ,निकिता दुधे, शिवानी बैस ,कल्पना पोहरे,प्रीती शिंदे ,सीमा परतवार, कार्तिक झोंबाडे उपस्थित होते.
तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....