कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) मनसे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश,सूचना , आव्हान देण्यात आल्यानुसार कारंजा मनसेकडून आक्रमक पवित्रा घेत बाळासाहेब ठाकरे समृद्धी टोल नाका कारंजा (लाड) येथे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुमारे सकाळी 7 वाजता पासून टोल बंद पडला.यावेळी त्यांना मनसे तर्फे मनसेच्या भाषेत अनुवाद करण्यात आला व सर्वच फोर व्हिलर वाहनांना मोफत सोडण्यात आले तसेच कोणाही चार चाकी वाहन चालकांना त्रास देण्यात आला.
तर कारंजा मनसे कडून खळखट्ट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.यावेळी मुख्य पदाधिकारी अधिकारी जिल्हा अध्यक्ष राजू पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर,कामगार महाराष्ट्र सदस्य ओमप्रकाश फड,आस्थापना जिल्हा अध्यक्ष अनिकेत चव्हाण,तालुका अध्यक्ष मनोज खडसे,शहर अध्यक्ष रवी वानखेडे,महादेव भस्मे,शहर सचिव कपिल महाजन शहर अध्यक्ष हरीश हेडा,संतोष घोडे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.