वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे 26 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दुपारी 12 वाजता यवतमाळ निवासस्थान येथून शासकीय वाहनाने दिग्रसकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता श्रीक्षेत्र पोहरादेवी,ता. मानोराकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे आगमन. दुपारी 3 वाजता नंगारा भवन,पोहरादेवी येथे आगमन, तिर्थक्षेत्र विकास पाहणी व राखीव. सायंकाळी 5 वाजता दारव्हाकडे प्रयाण करतील.