प्रखर वक्ते, पत्रकार, साहित्यकार कुशल संघटक भारतरत्न देशाचे माजी पंतप्रधान जनसं धते भाजपा माध्यमातून समाज सेवा करणारे अटल बिहारी वाजपेयी यांचं जन्मशताब्दी वर्ष निमित्त विविध कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात भाजपा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आव्हान भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त भाजपा कार्यालयात त्यांना अभिवादन करताना ते बोलत होते यावेळी पंडित मदन मोहन मालवीय, गोंदवलेकर महाराज, वीर बालक दिवस तुळशी दिवस स्त्री मुक्ती दिवस निमित्त विविध कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष जयंत मसने हे होते तर यावेळी किशोर मागटे, पाटील, गिरीश जोशी, माधव मानकर विजय अग्रवाल, संजय गोट फोडे, रमेश अल्करी, संतोष पांडे, संदीप गावंडे, दिलीप मिश्रा, हेमंत शर्मा संजय जोशी, विपुल घोगरे, अमोल साबळे, नितेश पाली, पल्लवीताई डोंगरे, सुनील बाढे, सुबोध गवई, जितेंद्र देशमुख, ध्रुव खुणे, लालाजोगी मनोज शाहू, विकी ठाकूर, प्रकाश श्री माळी, रमेश करीहार, संतोष डोंगरे, मंगेश सावरकर, एडवोकेट यशवंत ,दादळे गणेश सपकाळ, वसंता मानकर, एडवोकेट नितीन गवळी गोपाल मुळे मोहन गावंडे, संजय झाडोकार, कपिल बुंदिले, भरणे, सचिन मोदी राज उमेश श्रीवास, आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यात जन्मशताब्दी निमित्त अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस विविध सामाजिक किंवा सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात आला हे ठिकाणी अन्नदान , आरोग्य शिबिर विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला
आपल्या प्रतिक्रिया द्या....