वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहांतर्गत दि.०८ एप्रिल २०२५ रोजी स्थानिक सामाजिक न्याय भवन, नालंदानगर वाशिम येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला.यावेळी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थीना वितरित करण्यात आला.यावेळी विशेष अधिकारी आर.एस. चोंडकर, ए.बी. चव्हाण, एस.एस. पाटील, आर.एन. साठे उपस्थित होते. भारतीय संविधान उद्देशीकेच्या वाचनानंतर तालुका समन्वयक जी.ए. करंगे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजनेंतर्गत निवडक लाभार्थ्यांना जमीन मंजुरी आदेशपत्राचे वितरण करण्यात आले.सामाजिक समता सप्ताहांतर्गत वाशिमसह जिल्हाभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
"विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र व समाधिमार्ग पुस्तक देऊन गौरविण्यात आले.यात राजेश वाघमारे, अमर खाडे, जुहिता लिंगायत, प्रेरणा सुखदेवे, गणेश कांबळे यांचा समावेश होता.
"तृतीयपंथीय व्यक्तींचा सन्मान."
श्रावणी हिंगासपुरे,पायल भुरके, माधुरी राठोड, प्रविण कानडे, सुनील राठोड या तृतीयपंथीय व्यक्तींना देखील यावेळी गौरवण्यात आले.समाज कल्याण विभागाच्या योजनांमुळे आणि तृतियपंथी कल्याण मंडळाच्या शासकीय समिती मध्ये निमशासकिय सदस्य म्हणून मिळालेल्या सामाजिक प्रतिष्ठेचा उल्लेख करत श्रावणी हिंगासपुरे यांनी जिल्हा समाज कल्याण कार्यालया प्रती कृतज्ञता व्यक्त केली.