नागभिड --- तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पिसोरा अधीक असल्यामुळे धान पीक अर्ध्यावरच होणार या भितीने शेतकरी चिंतातुर दिसत आहे.
यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने धान पीक संकटात सापडले आहे.
शेतकऱ्यावर दरवर्षी संकट येत असते. पण संकटात संघर्ष करुन आपल्यात पिक पडेल ही आशा बाळगत असतो. पंरतु यावर्षी धान पिकात पिसोरा जास्त असल्याने धान पिक हातातुन निघुन जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. शेतकऱ्याच्या नशिबात कधी ओला दुष्काळ तर कधी वारला दुष्काळ ठरलेला असतो. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. शेतीच्या भरोस्यावर कुंटुब चालवने कठीण झाले आहे. कर्ज काढुन शेतकरी शेती करतो. पण दरवर्षी शेती तोट्यात जात आहेत. शेतीच्या भरोस्यावर मुलांचे शीक्षण, मुलींचे लग्न, आणी ऊदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. शेतीला एकरी २५ हजार रुपये खर्च येतो. धान पेरणी पासुन ते घरा पंर्यत येण्यासाठी चार महीने लागतात. या कालखंडात शेतकऱ्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर्षी निसर्ग कोपला आहे. धान कापणी साठी आले आहेत पण वातावरण बरोबर नसल्याने कापणी थांबुन आहे. ऐन दिवाळी तोंडावर आली आहे पण शेतकऱ्याकडे पैसा उरला नाही. अशी भयावह परीस्थीती पाहायला मिळत आहे. ऊत्पनात घट होणार आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे. पण शेतकऱ्यांचा धान पिकाला भाव भेटत नाही. दरवर्षी सारखाच भाव मिळत असल्याने शेतकरी खचुन जात आहे. म्हणून आजचा शेतकरी कर्जात जगतो व कर्जातच मरतो. ही परीस्थीती आजच्या शेतकऱ्याची आहे. या शेतकऱ्यांना वाली नाही. त्यामुळे धान पिकाला भाव मिळत नाही. मागील वर्षीचे बोनस मीळाले नाही. मायबाप सरकारने तातडीने लक्ष द्यावे. पीसोरा या रोगामुळे व तुळतुळा या रोगामुळे शेतकरी हालावुन गेला आहे. मायबाप सरकारणे शेतकऱ्यांच्या धान पिकांचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकऱ्या कडुन मागणी होत आहे.