आरमोरी येथे खास रामनवमीच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दिनांक 9 एप्रिल रोजी मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमाचे आयोजन आरमोरी शहरात केलेले आहे.
त्या निमित्ताने 3 एप्रिल 2024 रोजी आरमोरी येथील 71 लोकांचा जनसमुदाय त्यामध्ये उत्सव समितीचे रामभक्त अयोध्येला श्रीराम प्रभू यांच्या मंदिरातील अखंड ज्योत आणण्यासाठी जात आहेत गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे 9 एप्रिल रोजी ज्योतीचे आगमन होणार आहे
गुढीपाडव्याच्या दिवशी अयोध्ये वरून येणाऱ्या ज्योतीचे आगमन होऊन ही ज्योत नागपूर मार्गे सकाळी 7 वाजता वैनगंगा नदी या ठिकाणी पोचणार आहे इथून भव्य बाईक रॅली आणि कार रॅली सह ज्योतीचे स्वागत करून आगमन दत्त मंदिर आरमोरी बर्डी या ठिकाणी होणार असून त्यानंतर पायी ज्योती चे आगमन होणार आहेत तसेच या ज्योतीच्या आगमनाच्या निमित्ताने स्वागतासाठी आरमोरी येथील गायत्री परिवार , स्वरूप संप्रदाय सेवा समिती आरमोरी ,येथील सर्व मस्कऱ्या गणेश उत्सव मंडळ , श्री सर्व गणेश उत्सव मंडळ ,सर्व दुर्गा उत्सव मंडळ, सर्व शारदा उत्सव मंडळ ,युवा रंग क्लब आरमोरी, युवा मंच आरमोरी आणि आरमोरी येथील सर्व देवस्थान मंडळ पदाधिकारी आणि सदस्य गण या उत्सवामध्ये सहभागी होणार असून ढोल ताशाच्या गजरामध्ये पारंपारिक वेशभूषा धारण करून हे सर्व पदाधिकारी कार्यकारी मंडळी ,महिला मंडळी उपस्थित राहणार आहेत 9 तारखेला घटस्थापना होणार असून त्यानंतर 9 ते 17 एप्रिल दरम्यान श्रीराम नवरात्र उत्सव सोहळा या ठिकाणी पार पडणार आहेत तरी अयोद्या वरून येणाऱ्या या ज्योतीच्या आगमनाच्या निमित्ताने आरमोरी येथील व परिसरातील सर्व भाविक भक्त व मंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम स्वामी देवस्थान व श्रीराम नवमी उत्सव समिती आरमोरी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.