स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे दिव्यांग शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी समर्पित कार्यक्रम "स्वर संध्या" १२ जून २०२२ रोजी सायं ६ वाजता खुले नाट्यगृह येथे संपन्न होणार आहे, या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे पं. हरिप्रसाद चौरसिया यांची शिष्या कृतीका जंगिनमठ आपले बासरी वादन अकोल्यात प्रथमच स्वर संध्या ह्या कार्यक्रमात करणार आहे. कृतीका जंगीनमठ ह्यांना राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार प्राप्त असून देशभरातील नावलौकिक असणाऱ्या संगीत समारोहात त्यांनी आपली प्रस्तुती दिली आहे. आपल्या अंधत्वावर मात करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही यश संपादन केले आहे. स्वर संध्या ह्या संस्कृतिक कार्यक्रमात कृतिका जंगिनमठ शास्त्रीय संगीत, चित्रपट संगीत व फ्युजन ची प्रस्तुती करणार आहेत. सदर कार्यक्रमातून मिळणारा निधी दिव्यांग शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी समर्पित असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका संस्थेच्या हेल्पलाइन ०९४२३६५००९० ह्या क्रमांकावर कॉल करून मिळवाव्या किंवा अपेक्षा अपार्टमेंट क्र.२, फ्लॅट क्र.७ लहान उमरी अकोला येथे उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आव्हान प्रा.विशाल कोरडे, भारती शेंडे, अविनाश देशमुख, सुहास गद्रे, वसंत खंडेलवाल, रितेश मिरझापूरे, डॉ.उज्वला मापारी ,शैलेश खरोटे, राहुल पाटील, सरोज तिडके, सुबोध देशपांडे, सुनील हातेकर, प्रवीण पाटील, , डॉ. नितीन उपाध्ये, लता किडे, सुलेखा गुप्ता, प्रशांत देशमुख, सूर्यकांत भरकर व शिवप्रकाश शाह यांनी केले आहे.