कारंजा : सद्यस्थितीत एकीकडे खूप मोठी जाहिरात बाजी आणि गाजावाजा करून शासनाचा "शासन आपल्या दारी" "दिव्यांग कल्याण विभाग : दिव्यांगांच्या दारी" हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरु आहे. ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन जाहिरात बाजीवर आणि मंत्र्याच्या कार्यक्रमांवर लाखो-करोडो रुपयांची धुळधाणी सुरु आहे.तर दुसरीकडे मात्र शासनाच्या अनुदानावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध,दिव्यांग,दुर्धर आजार ग्रस्त,विधवा,घटस्फोटिता, परित्यक्त्या नागरिकांना गेल्या जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर अशा तिन महिन्यांपासून,संजय गांधी योजने अंतर्गत मिळणारे शासकिय अनुदान न मिळाल्याने गरजू निराधारांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. महत्वाचे म्हणजे निराधार व्यक्तींना शासनानेच दरमहा अनुदानाची सवय लावून दिली आहे.शिवाय संजय गांधी योजने अंतर्गत दरमहा नविन लाभार्थ्यांना अनुदान मंजूर केले जात असते त्यामुळे लाभार्थ्याच्या संख्येत दरमहा वाढ होत रहाते मात्र सातत्याने अनुदानाची मागणी केल्यानंतरही गेल्या तिन महिन्यांपासून अनुदान रखडल्यामुळे उदरनिर्वाह व औषधोपचाराकरीता 100% अनुदानावर अवलंबून असणाऱ्या खऱ्या लाभार्थ्यांची अनुदानाविना चांगलीच पंचाईत झालेली असून, ते बिचारे,दररोज तहसिल कार्यालय आणि बँकाच्या येरझारा मारीत आहेत. तरी याची दखल आमदार राजेंद्रजी पाटणी यांनी घेऊन,शासनाकडून अनुदान प्राप्त करून घेऊन, कारंजा तहसिल कार्यालयामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात विनाविलंब वळते करण्याची मागणी होत आहे .