घुग्घुस (चंद्रपूर) : शुक्रवारचा रात्री दहा वाजताचा सुमारास घुग्घुस येथील लॉयड मेटल कंपनीच्या गेटजवळील एका घरात गेल्या दोन महिन्यांपासून खुलेआम आयपीएल सट्टेबाजी सुरू होती.
गोपनीय माहीतीचा आधारावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी आणि एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला. या धाडसत्रात घटनास्थळी सहा बुकींना पकडण्यात आले. तर दोन बुकी फरार झालेत.
पकडण्यात आलेल्या बुकींचे मोबाईल, एक डस्टर चारचाकी वाहन आणि फॉर्च्युनर वाहन जप्त करण्यात आले. या संदर्भात एसडीपीओ आयुष रोपानी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले " या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ आरोपी असून त्यापैकी साह बुकी आणि घुग्घुस, यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील काही लोक आणि घरमालक यांचा समावेश आहे.
या सर्वांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, कायदेशीर प्रक्रियेनंतर संपूर्ण माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले.