तालुकास्तरीय मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा
ब्रम्हपुरी:-
ग्रामविकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ग्राम विकासाला वळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने सर्वांना बरोवर घेऊन 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' तयार करण्यात आले आहे. लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोवत घेऊन काम करावे, असे आवाहन पंचायत समिती ब्रम्हपुरीचे माजी सभापती प्रा.रामलाल दोनाडकर यांनी केले.
ते ब्रम्हपुरी येथील विठ्ठल-रुक्मिणी सभागृहात पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत आयोजित 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' तालुकास्तरीय कार्यशाळा कार्यक्रमात अध्यक्ष
स्थानावरून अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटक क्रिष्णाजी सहारे माजी उपाध्यक्ष जि. प चंद्रपूर हे होते तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून माजी जि.प. सदस्य प्रा. राजेश कांबळे, माजी जि. प सदस्य प्रमोद चिमूरकर, माजी जि.प सदस्य दिपाली मेश्राम व खेमराज तिडके, प्रशासक तथा गट विकास अधिकारी रवींद्र घुबडे, बालविकास प्रकल्प अधिकारी राठोड, गटशिक्षणाधिकारी माणिक खुणे, वांद्रा ग्रामपंचायतचे सरपंच महादेव मडावी, सुरबोडी ग्रामपंचायतच्या सरपंच राधिका बाट विकास अधिकारी रवींद्र घुबडे म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७सप्टेंबर पासून या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ याकालावधीत हे अभियान राबविण्यात येईल.
चक बोथली, सुरबोडी, तोरगाव खुर्द, कन्हाळगाव ग्रामपंचायतीचा सन्मान
पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा व अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी विस्तार अधिकारी पंचायत मिलिंद कुरसुंगे यांनी पीपीटी च्या माध्यमाने सदर अभियानाचे मार्गदर्शन केले. आर. आर. आबा पाटील सुंदर ग्राम पंचायत मध्ये जिल्हा स्तरीय उत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायत वांद्रा, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायत सुरबोडी तसेच कर वसुलीमध्ये १०० टक्के अग्रेसर असणारे ग्रामपंचायती चकबोथली, सुरबोडी, तोरगाव खुर्द व कन्हाळगाव या ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.
आपल्या प्रतिक्रिया द्या....