कारंजा (लाड) : कारंजा येथील प्रतिष्ठित निलेश यशवंत सोने यांचे वयाच्या 55 व्या वर्षी दि 30 डिसेंबर रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे . अत्यंत मनमिळाऊ शांत स्वभावाचे निलेश सोने मित्रमंडळी ना सतत हसवीत होते .मित्रमंडळी मध्ये "निळू अण्णा"नावाने त ओळखले जायचे.प्लॉट एजंट म्हणून सर्व दूर त्यांची ओळख होती. त्यांचा आकस्मिक मृत्यु मित्रमंडळीना चटका लावून गेला आहे. त्यांच्या मृत्युनंतर परिवारात पत्नी,एक मुलगी,भाऊ ,बाहिन असा बराच आप्त परिवार आहे. दि 31 डिसेंबर रोजी दुपारी 02:00 वाजता कारंजा बायपास स्थित हिंदू स्मशान भूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांचेसह बराच मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी त्यांना सामुहीक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.त्यांचे वर्गमित्र साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे संजय कडोळे,उमेश अनासाने यांनी सुद्धा त्यांना मौन श्रद्धांजली अर्पण केली.