वाशिम - महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवार, १९ जुन रोजी स्थानिक पाटणी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात पहिली ते चौथीच्या हिंदी पाठ्यपुस्तकांची होळी करण्यात आली.
या आंदोलनाच्या माध्यमातून मनसेने शासनाचा जोरदार निषेध नोंदवला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजु किडसे यांनी स्पष्ट इशारा दिला की, राज्य शासनाने हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपात राज्यभरात आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनात मनसेचे जिल्हा सचिव गजानन वैरागडे, जिल्हा उपाध्यक्ष अतिश डहाळे, मनविसे उपजिल्हाध्यक्ष गजानन कडणे, अनिकेत शेटे, वाशिम तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, मालेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, वाशिम शहराध्यक्ष शिवाजी इंगोले, वाहतूक शहराध्यक्ष उमेश टोलमारे, मालेगाव उपतालुकाध्यक्ष रामेश्वर वाघ, अनसिंग सर्कल अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, महाराष्ट्र सैनिक राजू हिंगणे, महादेव डाखोरे, किशोर चव्हाण, बाळू रोकडे, शिवाजी चव्हाण, योगेश डाखोरे, कैलास रवंदळे, सौ. पुष्पाताई रवंदळे, सौ. वंदना अक्कर यांच्यासह असंख्य मनसे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.