कारंजा : महाराष्ट्रात परत एकदा कोव्हिड १९,कोरोना विषाणुजन्य आजाराने तोंड वर काढलेले असून,मुंबई,पुणे व इतरत्र जिल्ह्यामध्ये कोरोना आजारग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली असून,सध्या विवाह समारंभ आणि यात्रा महोत्सवा निमित्ताने, जनतेचे बाहेरगावी आवागमन सुरुच असते.परंतु सध्या कोरोना रुग्नसंख्या वाढतच चालली असल्याने विदर्भातील जनतेने सतर्कता बाळगणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे कोणत्याही कार्य निमित्ताने मुंबई कडील व इतरत्रही प्रवास करतांना कोरोना विषाणू संसर्गापासून दूर रहाण्यासाठी सर्वांनी दक्षता घेणे जरूरी आहे. शिवाय सध्या पावसाळा ऋतू सुरु असल्यामुळे, आधीच जलजन्य आजारांची संख्या वाढतच रहाते.त्याशिवाय डासांच्या प्रादुर्भावामुळे,डेंग्यु, हिवताप (मलेरिया),टायफाईड, अतिसार,यासारखे आजार डोके वर काढत आहेत. शिवाय मुंबई, पुणे विभागात दिवसेंदिवस कोरोना रुग्नसंख्याही वाढत आहे.त्यामुळे नागरिकांनी आरोग्याबाबत थोडीजरी कुणकूण लागली तर त्वरीत आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.जवळच्या प्राथमिक आरोग्य केन्द्रात किंवा उपजिल्हा रुग्नालयात जावून आपल्या रक्ताची तपासणी करून डॉक्टराच्या सल्ल्याप्रमाणे उपचार सुरु करावे. स्वच्छता ठेवावी.आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे.तसेच पावसाळ्यामध्ये नदी नाले विहीरी आणि बोअरवेल्सला नविन पाणी येत असल्याने, आपले पिण्याचे पाणी उकडून, निर्जतुकीकरण करून, पाण्यामध्ये जीवनड्रॉप टाकूनच प्यावे.बाहेरून घरी आल्यावर आपले हातपाय पाण्यामध्ये डेटॉल टाकून स्वच्छ धुवावेत. गर्दीमध्ये वेळप्रसंगी मास्कचा वापर करावा.उघड्या वरील खाद्यपदार्थ आणि आठवडी बाजारातील हॉटेलचे खावू नये.व भाजीपाला व फळफळावट स्वच्छ धुतल्या शिवाय फ्रिजमध्ये वा घरात आणू नये.रुग्नाला भेटायला गेल्यानंतर संपर्क न होऊ देता दुरुनच बोलावे.आपल्या स्वतःच्या व कुटूंबियाच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी.असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवी संजय कडोळे यांनी केले आहे.