कारंजा : स्थानिक वाशिम महामार्गा जवळील, शिंदे नगर येथील श्रींचे सेवाधारी गजानन कडू यांच्या संत गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज प्रगट दिना निमित्त वार्षिकोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून भजन, पूजन कार्यक्रम होत आहेत . सोमवारी प्रातःकाळी श्री कामाक्षादेवी संस्थानचे अध्यक्ष असलेले पुरोहित दिगंबरपंत महाजन ( महाराज ) यांच्या मंत्रोच्चार विधी पूजनाने, गजानन कडू व सौ. विजयाताई कडू यांच्या शुभहस्ते श्रींचा अभिषेक व होमहवन होऊन महाआरती होईल त्यानंतर संपूर्ण शिंदेनगर वसाहती मध्ये पुरणपोळीच्या महाप्रसादाचे वितरण केल्या जाणार आहे . तरी श्री भक्त मंडळींनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन कडू परिवाराकडून करण्यात आले आहे. असे वृत्त श्रींचे सेवेकरी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.