गडचिरोली : आरमोरीवरून प्रवासी घेवून गडचिरोलीकडे येणा-या काळी-पिवळी वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी होवून झालेल्या अपघातात चालकासह 10 प्रवासी जखमी झाल्याची घटना गडचिरोली- आरमोरी मार्गावरील साखरा बसथांब्याजवळ बुधवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. जखमींमध्ये 7 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे.
जखमींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, एमएच 33-0631 क्रमांकाचे काळी- पिवळी वाहन आरमोरीवरून प्रवासी घेवून
गडचिरोलीकडे येत होते. दरम्यान, साखरा बसथांब्याजवळ एका व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने काळी-पिवळी वाहन रस्त्यावरच पलटी झाले. यात वाहनातील 7 महिला, चालक व अन्य दोन पुरुष प्रवासी जखमी झाले. अपघात घडताच गावातील नागरिकांनी 108 रुग्णवाहिकेला फोन केला.
अपघातस्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींपैकी 9 जणांना उपचार करून सुटी देण्यात आली. तर चालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहेत.. घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना देण्यात आली.