चंद्रपूर : घुग्घुस येथील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली आहे. एका अल्पवयीन मुलीशी नागपूर येथील आरोपीचे संबंध जुळले त्याने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. घुग्घुस पोलिसांना तक्रार प्राप्त होताच कलम 376, पोक्सोचा गुन्हा दाखल केला. शनिवारी नागपूर येथून आरोपी निखिल शर्मा (24) यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहा. पो. नि. मेघा गोखरे करीत आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यातील चिमूर, पोंभुर्णा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली होती.