अकोला : स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती बुधवार रोजी खेंडकर ज्ञानगंगेच्या परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विष्णुपंत खेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती.
स्त्री शक्तीचा आवाज आणखी बुलंद करण्याचा संकल्प करीतत क्रांतीज्योतीला अभिवादन करण्यात आले. देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या शिक्षणाची आराध्यदैवत असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेस विष्णुपंत खेंडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
आपल्या अध्यक्ष भाषणात त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवाचे रान करून स्त्रियांना शिक्षण देण्याचे व जनजागृती करण्याचे मोलाचे कार्य केले, असे प्रतिपादन केले.
दरम्यान यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन हुशार जगदाळे तर आभार प्रदर्शन शिक्षक प्रज्ञानंद थोरात यांनी केले. यावेळी शितल तिवारी, कांचन तायडे, मनीषा अंभोरे, प्रशांत काळे, अश्विनी सोळंके, पल्लवी हिंगणकर, अंजु मुंढे व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आपल्या प्रतिक्रिया द्या....