ग्राम तेली घाटबोरी येथे आज एक मोठी दुख: द घटना घडली आहे. त्या मुळे गावात शोककळा पसरली आहे. शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या अंगावर आकाशातून अचानक विज पडल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी तालुक्यात विजेच्या कडकडाटा सह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्या मुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे कामे बंद करून घरी परतले. माहिती नुसार घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव ओमदास सखाराम वाघाळे वय 55 वर्षे रा. घाटबोरी तेली असे आहे. ही घटना आज 21 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी घडली आहे.