दिवसरात्र समाजाची सुरक्षा करीत वाईट प्रवृत्तीच्या इसमांना धडा शिकवुन समाजातील स्त्रियांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी महत्वाची भुमिका पोलीस बांधव पार पाडत असतात. समाजातील स्त्रियांचे पाठीराखे बनुन भावासमान त्यांची सुरक्षितता करत असतात. त्यामुळे पोलिस बांधवांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे जावून ब्रम्हपुरी महीला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राख्या बांधल्या आहेत.
सोबतच पक्षकार्य करीत असतांना पक्षामध्ये सोबत घेऊन चालत भावासमान प्रत्येक गोष्ट समजावून सांगणारे व प्रत्येक अडीअडचणीच्या संकटकाळात मदतीसाठी धावून येत भावासम पाठीशी उभे राहणाऱ्या काॅंग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना देखील यावेळी महीला काँग्रेसच्या महीलांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात राख्या बांधल्या आहेत.