तिरोडा येथून कोळसा खाली करून परतणारा ट्रक व मोहाडी येथून मध्यप्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या तवेरा गाडीत जोरदार धडक झाली. यात कारचा समोरील भागाचा पुर्णपणे चुराडा होवून गाडीत बसलेले प्रवासी जखमी झाले. यात 8 जणांना किरकोळ दुखापत झाली तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात तुमसर भंडारा रोडवरील खरबी शेत शिवारात घडली. चालक ट्रकसह पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस सुत्रांकडून प्राप्त माहितीप्रमाणे तिरोड्यावरून कोळसा खाली करून परतीच्या प्रवासात असलेल्या ट्रकने मोहाडीवरून वाराशिवणी (म.प्र) येथे जाणाऱ्या टवेरा कारला खरबी शेत शिवारातील वळण रस्त्यावर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की गाडीची दिशा बदलून ती शेतात फेकल्या गेली. तर ट्रकचालक धडक देवून पसार झाला.